हायलाइट्स:

  • रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी
  • राणा यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप
  • आरोपानंतर रवी राणा यांनी दिलं आव्हान

अमरावती : अमरावतीत सोमवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. जिल्हा नियोजन बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रवी राणा यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, तर यशोमती ठाकूर यांनी राणा यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप केला. या आरोपानंतर आता रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना खुलं आव्हान दिलं आहे.

‘यशोमती ठाकूर यांनी माझ्यावरील आरोप १५ दिवसात सिद्ध करावे आणि आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो. मात्र आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या,’ असं आव्हान रवी राणा यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ! थेट सोनिया गांधींना पत्र लिहून सचिन सावंत यांचा राजीनामा

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रवी राणा आक्रमक

रवी राणा यांनी सोमवारी कुजलेलं सोयाबीन जाळून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत घेण्याची मागणी केली होती. मात्र तो ठराव न घेण्यात आल्याने ते बैठकीत आक्रमक झाले.

‘शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास यशोमती ठाकूर यांचा ताफा अडवून त्यांच्या गाडीची चावी हिसकावणार,’ असा इशाराही रवी राणा यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं असून आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here