करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपाययोजनांची माहिती देण्यापूर्वी नागरिकांना एक आवाहन केलं. ‘काही सोप्या गोष्टी आहेत. ज्या केल्यावर करोनाचा संसर्ग होण्यापासून नागरिक वाचू शकतात,असं ते म्हणाले. नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हात जोडले आणि ‘नमस्ते’ केलं. हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्ते’ करा, असं नेतान्याहू यावेळी म्हणाले.
इस्रायलने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष बनवले आहेत. तसंच विमान प्रवाशांबाबत काही निर्देशही देण्यात आलेत, असं त्यांनी सांगितलं. इस्रायलमध्ये आतार्यंत १५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. पण करोनाने तिथे कुणाचा बळी गेलेला नाही.
करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तिपासून किमान दोन ते तीन फूट अंतर ठेवा. संसर्ग टाळण्यासाठी करोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या एकदम जवळ जाऊ नका. त्याच्याशी हात मिळवू नका. शक्य झाल्यास मास्कचा उपयोग करा. तसंच वेळो-वेळी आपले हात स्वच्छ धुवा, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times