बांगलादेशातील हिंदू समाजाविरोधात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना तस्लिमा यांनी बांगलादेशमधील हिंदू आणि बुद्धधर्मीय तिसऱ्या वर्गाचे नागरिक ठरले असल्याचे सांगून वाढती हिंदूविरोधी मानसिकता ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला. मुस्लिमविरोधी भूमिका मांडल्यामुळे मूलतत्त्ववादी गटाकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्याने तस्लिमा यांना १९९४मध्ये बांगलादेश सोडावा लागला होता.
हिंदूविरोधी भावना ही बांगलादेशात नवीन नाही, असे असूनही दुर्गा पुजेदरम्यान हिंदूंना संरक्षण न दिल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘प्रत्येक वर्षी दुर्गा पूजेदरम्यान हिंदूंवर ‘जिहादी’ हल्ला होण्याची शक्यता असते, हे शेख हसिना यांना चांगलेच माहीत आहे. तरीही हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण का देण्यात आले नाही. जर सरकारला त्यांचे संरक्षण करायचेच असते, तर त्यांनी ते केले असते,’ असेही त्या म्हणाल्या.
कारवाईचे आदेश
धर्माचा वापर करून हिंसा घडवून आणणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी गृहमंत्र्यांना दिले. सोशल मीडियावरील कोणत्याही बाबीची शहानिशा केल्याशिवाय, त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times