हायलाइट्स:
- मध्य प्रदेशातील जबलपूरमधली घटना
- परिसरात तणावाचं वातावरण
- उपद्रवींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरमधल्या मच्छी बाजारात ही घटना घडली. मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्तानं मिलाद-अन-नबी साजरी करण्यासाठी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येत लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गोळा होत होते. निर्धारीत मार्गानं जाण्यासाठी पोलीस त्यांना विनंती करत होते. संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात पोलीसही सावध होते.

गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर
जबलपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक सिद्धार्थ बहुगुणा यांच्या म्हणण्यानुसार, मच्छी बाजार हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे इथे मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, अचानक काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसंच जळते फटाकेही पोलिसांवर फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला.
जिल्हाधिकारी कर्मवीर शर्मा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर फटाके आणि दगड फेकणाऱ्या असामाजिक तत्त्वांची ओळख पटवण्यात यश आलंय. अशा उपद्रवींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times