हायलाइट्स:
- कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कतील यांचं वादग्रस्त वक्तव्य
- मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्यावर टिप्पणी
- काँग्रेसकडून माफीची मागणी
‘राहुल गांधी कोण आहेत? राहुल गांधी ड्रग पेडलर आणि ड्रग अॅडिक्ट आहेत. ते पक्ष चालवण्याच्या योग्यतेचे नाहीत… हे मी नाही तर मीडियामध्ये आलंय’, असं म्हणत मीडियाच्या माध्यमातून नलीन कुमार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
नलीन कुमार यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसनं हा मुद्दा उचलून धरल्या. कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी भाजप नेत्याच्या या वक्तव्याची निंद केलीय. तसंच नलीन कुमार यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आपलं राजकारण हे सभ्य आणि सन्मानजनक असायला हवं, असं मला वाटतं. आपल्या विरोधकांसाठीही… मला आशा आहे की भाजपही माझ्या या मताशी सहमत असेल आणि प्रदेश अध्यक्ष नलीन राहुल गांधी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या अपमानजनक टिप्पणीबद्दल माफी मागतील, असं ट्विट शिवकुमार यांनी केंय.
पंतप्रधानांवर टिप्पणी
यापूर्वी, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील एक वादग्रस्त ट्विट चर्चेत आलं होतं. टीकेनंतर हे ट्विट हटवण्यात आलं होतं. आपल्या ट्विटमध्ये शिवकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अंगुठाछाप’ आणि ‘अडाणी’ म्हटलं होतं. मात्र, टीकेनंतर राजकारणात अशा पद्धतीची टिप्पणी सभ्य आणि संसदीय भाषेच्या विरुद्ध आहे, असं मान्य करत त्यांनी आपलं ट्विट हटवलं होतं.
कर्नाटकात ३० ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times