हा साथीचा रोग आहे. अशा प्रसंगी नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी करोनाची चाचणी करायला हवी होती, असं बिधुरी म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंसाचार झालेल्या दक्षिण दिल्लीतील ब्रजपुरी इथल्या अरुण पब्लिक स्कूलला भेट दिली. हिंसाचारा ही शाळा पेटवली गेली. यावेळी राहुल गांधी यांनी हिंसाचारावरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. ही शाळा पेटवून द्वेष आणि हिंसेने हिंदुस्थानचं भविष्य संपवलं. हिंसा आणि द्वेष विकासाचे शत्रू आहेत. याने भारत मातेचा कुठलाही फायदा होणार नाही. एकजूट होऊन काम करणच योग्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी अलिकडेच इटलीहून परतलेत. आता विमानतळावर त्यांनी करोनाची तापसणी केलीय की नाही. नागरिकांमध्ये जाण्यापूर्वी तरी राहुल गांधींनी करोनाची चाचणी करायला हवी होती. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असं म्हणत बिधुरी यांनी राहुल गांधींना टोला लगावला. भारतात आतापर्यंत २९ जणांना करोनाची लागण झालीय. यातील १६ जण इटलीचे पर्यटक आहेत. तर राहुल गांधींनी अलिकडेच विदेश दौरा केलाय, याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times