हायलाइट्स:

  • भाज्यांच्या वाढत्या किंमती खिसा कापणार
  • मुंबईत टोमॅटो भाव वाचून हादराल
  • पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले

मुंबई: मुंबईत दिवाळीच्या अगदी आधी भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भाज्यांची लागवड पावसात खराब झाली आहे. बाजारात भाज्या कमी येत असल्यामुळे महागही झाल्या आहेत. टोमॅटोची किंमत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या बरोबरीने केली जात आहे. अशा परिस्थितीत खायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो.

टोमॅटो पूर्वी २० रुपये किलो होता, आज मुंबईत ८० रुपये किलो मिळत आहे. जिथे आधी कांदा ३० रुपये किलो होता, तो आता ५५ रुपये किलो झाला आहे. अशा प्रकारे प्रत्येक भाजी ३० ते ४० रुपये प्रति किलोने महाग झाली आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या बाजारातून मुंबई आणि आसपासच्या भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. वाशीच्या घाऊक बाजारात भाजीपाला खूप महाग आहे, त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला दुप्पट ते तिप्पट दरात उपलब्ध होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे भाज्यांची वाहतूक महाग झाली आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला महाग विकावा लागत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात…

राज्यातील सर्वात महागडी हिरवीगार कोथिंबीर नागपुरात विकली जात आहे. नागपुरातील किरकोळ बाजारात ३२० ते ३६० रुपये किलो मिळत आहे. प्रदीर्घ पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भाज्या खराब झाल्या आहेत. नागपूरच्या कापूस बाजारात हिरवी कोथिंबीर २५० ते ३०० रुपये किलो मिळत आहे. यामुळेच किरकोळ बाजारात त्याची किंमत ३२० ते ३६० रुपये प्रति किलो झाली आहे.

ड्रग्जविषयी आर्यन खानची अभिनेत्रीशी चर्चा; व्हॉट्सअॅप चॅट कोर्टापुढे
पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले

पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज वाढत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या दरानुसार, मुंबईत पेट्रोल १११.७७ रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर एक लिटर डिझेलसाठी १०२.५२ रुपये खर्च करावे लागतात. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर ११५.७३ रुपये आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेल महाग होत आहे. दिल्लीत पेट्रोल १०५.८४ आणि डिझेल ९४.५७ लिटर मिळत आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर लवकरच पेट्रोल १२० रुपये प्रति लीटरने विकण्यास सुरुवात होईल.

… म्हणून भावना गवळी ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here