हायलाइट्स:

  • आग्र्यातील जगदीशपुरा भागातील घटना
  • अरुण वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू
  • काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी पीडित कुटुंबीयांच्या भेटीला

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या जगदीशपुरा भागात कथितरित्या पोलीस कोठडीत एकाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या व्यक्तीचं नाव अरुण वाल्मिकी होतं.

सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

१७ ऑक्टोबर रोजी एका संस्थेत २५ लाख रुपयांच्या चोरीचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी सफाई कर्मचारी असलेल्या अरुण वाल्मिकी याला ताजगंज भागातून ताब्यात घेतलं होतं. चोरीच्या घटनेनंतर अरुण फरार होता. बुधवारी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. परंतु, आज सकाळी वाल्मिकीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रियांका गांधी पीडित कुटुंबीयांच्या भेटीला

या घटनेनंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी गुरुवारी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी दिल्लीहून आग्र्याला निघाल्या असताना त्यांना यमुना एक्सप्रेस वेवर रोखण्यात आलं. या दरम्यान एक्सप्रेस वेजवळ पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत धुमश्चक्रीही झाली.

lakhimpur kheri violence : सुप्रीम कोर्टाने यूपी सरकारची काढली खरडपट्टी, ‘स्टेटस रिपोर्टची रात्री उशिरापर्यंत वाट बघितली’
Karnataka: राहुल गांधी ‘ड्रग अॅडिक्ट’, ‘ड्रग पेडलर’; भाजप नेत्याची वादग्रस्त टिप्पणी

प्रियांका गांधी यांना अडवलं
यावर, मला केवळ पीडित कुटुंबीयांचं दु:ख वाटण्यासाठी आग्र्याला जाण्याची इच्छा आहे. विरोधी नेत्यांपासून अखेर सरकारला का भीती वाटते? असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला विचारला आहे.

या अगोदर, एखाद्याला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार मारणं हा कुठचा न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरुण वाल्मिकी यांच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. वाल्मिकी जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्या संदेशाविरुद्ध काम केलंय, असं म्हणत प्रियांका गांधी यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशी आणि बेजबाबदार पोलिसांविरोधात कारवाईची तसंच पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली होती.

Violence in Bangladesh: बांगलादेश ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ म्हणून घोषित करावं : विश्व हिंदू परिषदेची मागणी
Uttar Pradesh: २६० कोटींच्या कुशीनगर विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, श्रीलंकन बौद्ध भिक्खूंची हजरी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here