aryan khan bail applications: आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया – ncp leader nawab malik reaction on mumbai special ndps court rejects bail applications of aryan khan
मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज विशेष एनडीपीएस कोर्टानं फेटाळून लावला आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (नवाब मलिक) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
‘न्यायाधीशांनी जो निर्णय दिला आहे त्याच्यावर माझा कुठलाही आक्षेप नाही. ज्या प्रकारच्या युक्तीवाद करण्यात आला आहे त्यावरही मला आक्षेप नाही. एनडीपीएस कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंत एनडीपीएस कोर्टाच्या वकिलांचा युक्तीवाद प्रत्येक वेळी बदलतो. ते नवीन नवीन विषय दरवेळी कोर्टात आणतात. काही लोकांना अडकवण्याचा हा नवीन डाव आहे. असेच बरेच डाव आम्ही पाहिले आहेत. आमच्या प्रकरणामध्ये पाच लाखांपर्यत व्हॉट्सअॅप चॅट दाखवत राहिले. त्याचा उल्लेख चार्जशिटमध्ये नाही. लोकांना जामीन मिळू द्यायचा नाही,’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. Aryan Khan ड्रग्ज पार्टी प्रकरण: आर्यन खानला कोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला ‘माझ्याकडे एक प्रकरण असे आहे ज्यात त्यांनी हा जामीन पात्र गुन्हा आहे असे लिहून दिले आहे. प्रसिद्धीसाठी लोकांना अडकवायचे, जामीन मिळू द्यायचा याद्वारे दहशत निर्माण करायची, खंडणी वसूल करायची हे या मुंबईमध्ये सुरु आहे. आज नाही तर उद्या यातील ९० टक्के प्रकरणे ही खोटी आहेत हे कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे,’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘मी काही पुरावे गोळा करत आहेत. याच्यातील ९० टक्के प्रकरणी ही कशी तयार करण्यात आली याचे पुरावे आम्ही गोळा करत आहोत. काही वकिलांमार्फत यासंदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे. जर याची चौकशी झाली तर हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध होणार आहे. राजकीय लोकांमुळेच ही सगळी यंत्रणा काम करत आहे. लोकांवर दबाव निर्माण करतेय खोटे केसेस करुन ही यंत्रणा मुंबईत पैसे काढण्याचा हा प्रकार आहे. हे सिद्ध होईल,’ असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.