हायलाइट्स:
- घरातच आढळला तरुणीचा मृतदेह
- नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचाही संशय
- घटनेनं नगर जिल्ह्यात खळबळ
यासंबंधी मिळालेली माहिती अशी की, जवळे गावाजवळील बारशीले वस्तीवर एक मजुर कुटुंब वास्तव्यास आहे. पती-पत्नी दोघेही रोजंदारीने कामाला जातात. बुधवारीही ते कामाला गेले. त्यावेळी त्यांची मुले घरी होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारात मुलगा क्लासला गेला. त्यावेळी त्याची मोठी बहीण घरात एकटीच होती.
क्लास सुटल्यावर मुलगा घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात निपचित पडली होती. ती प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरड केली. त्यावेळी आजुबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
घरात मुलीचा मृतदेह जेथे पडला होता, तेथे एक चाकू आणि टॉवेलचा बोळा आढळून आला. तिला चाकूचा धाक दाखवून, तोंडात बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. तेथून अद्याप अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. ही माहिती मिळाल्यानंतरच नेमकं काय झालं आहे, ते स्पष्ट होईल.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times