: गांधीनगर परिसरातील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स) भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. अखेर आज, गुरुवारी पहाटे मादी जातीचा झाला आहे. बिबट्याचा संचार असल्यानं कॅट्सच्या धावपट्टीवर अडथळा निर्माण होत होता.

गांधीनगरातील कॅट्स भागात गेल्या आठवड्यातच अंदाजे आठ वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पिंजऱ्या अडकला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत याच भागात मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याचं वय अंदाजे आठ वर्षे आहे. गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्याचं दर्शन होत आहे. मुक्त संचार वाढल्यानं कॅट्सच्या धावपट्टीवरही अडथळा निर्माण होत होता.

पाऊलखुणांचा माग

‘कॅट्स’मध्ये जवानांना प्रशिक्षण दिले जात असल्याने, येथे सुरक्षा महत्त्वाची असते. गेल्या पंधरा दिवसांपासून नियमितपणे बिबट्याच्या पाऊलखुणांचा माग घेतला जात होता. वन कर्मचारी ‘कॅट्स’च्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत होते. सातत्याने पिंजऱ्याची जागा बदलल्यानंतर शनिवारी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत मादी जातीचा आणखी एक आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here