अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी आपण लवकरच स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा करू, असे सांगत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्यास भाजपसोबत जागावाटपाची आशा असल्याचा दावा केला होता. जोपर्यंत मी माझे लोक आणि राज्याचे भविष्य सुरक्षित करत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही, असेही ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना ‘कॅप्टन अमरिंदर सिंग फक्त स्वतःचा, कुटुंबाचा आणि मित्रांचा विचार करतात,’ असा टोला रंधवा यांनी लगावला.
‘अमरिंदर अरे देशभक्त’
अमरिंदर सिंग हे देशभक्त आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय हितांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याशी युती करण्यास भाजप तयार आहे, असे प्रमाणपत्र भारतीय जनता पक्षाने बुधवारी दिले. सिंग यांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम यांनीहे वक्तव्य केले.
‘शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या हिताच्या दृष्टीने सोडवल्यास भाजपसोबत जागावाटप करू,’ या सिंग यांच्या वक्तव्यावर बोलताना गौतम म्हणाले की, सिंग शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत होते. आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. वेळ येईल तेव्हा आम्ही एकत्र बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करू. शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times