ब्राझिलिया: करोना महासाथीच्या आजाराला अटकाव करण्यासाठी योग्य प्रकारे पावले न उचलण्यासाठी चक्क राष्ट्रपतींविरोधात खटला चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ब्राझीलच्या संसदीय समितीने राष्ट्रपती बोल्सनारो यांच्याविरोधात मानवतेविरोधातील गुन्ह्यासाठी खटला चालवण्याची शिफारस केली आहे. संसदीय समितीने बोल्सोनारो यांच्याविरोधात ९ आरोपांतर्गत खटला चालवण्याची शिफारस केली आहे.

ब्राझीलचे सिनेटर रेनॉन कॅलहायरोस यांनी संसदीय समितीचा अंतिम अहवाल सादर केला. ही समिती राष्ट्रपती बोल्सोनारो सरकारच्या करोना विषाणूबाबतच्या धोरणांची चौकशी करत होती. सहा महिन्याच्या चौकशीनंतर हा अहवाल सादर करण्यात आला. जवळपास १२०० पानी अहवालात सरकारी निधीचा दुरुपयोग झाला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सरकारने कोविड महासाथीच्या आजाराच्या पहिल्या टप्प्यात मलेरिया औषधाची शिफारस करण्याशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही.

तालिबानचा दावा; अफगाणिस्तानला मदत करण्यास भारताची तयारी
राष्ट्रपती बोल्सोनारो यांच्याविरोधात महाभियोगही चालवण्याची शिफारस समितीने केली आहे. या शिफारसी मंजूर करण्याबाबतचा निर्णय चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष घेणार आहेत. विद्यमान अध्यक्ष हे बोल्सोनारो यांच्या जवळचे समजले जातात. पुढील आठवड्यात या समितीच्या अहवालावर मतदान होण्याची शक्यता आहे.

‘या’ देशात करोनाची पाचवी लाट?; रुग्णालयात बाधितांची संख्या वाढली
बोल्सोनारो यांनी करोना महासाथीला फारसं गांभीर्याने घेतले नव्हते. करोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यांनी लॉकडाउन अथवा कठोर निर्बंध लागू केले नव्हते. त्याशिवाय, करोना लशीवरही त्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here