जालना : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जालना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज सकाळी गांधी चमन परिसरात गॅस सिलेंडर हातगाडीवरती घेवून धिंड काढून आंदोलन करण्यात आले आहे.

देशात पेट्रोल व डिझेल दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीशी सामना करत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना आणखी वाढ करत आहे.
समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप; नवाब मलिक यांनी मालदीव, दुबईमधले फोटो केले शेअर
पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असतांनाही केंद्र सरकार यावर कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही म्हणून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन व निदर्शने करून केंद्र सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ तात्काळ मागे न घेतल्यास पुर्ण जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here