जेरुसलेम: इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि इतर नेत्यांशी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये द्विस्तरावरील संबंध मजबूत करण्यासाठी चर्चा झाली. यामध्ये बदलती भूराजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवरही उभयतांत चर्चा झाली. जयशंकर पाच दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा इस्राईलचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान बेनेट यांनी भारतावर आमचे प्रेम असून आमचा चांगला मित्र असल्याचे म्हटले.

जयशंकर यांनी पंतप्रधान बेनेट यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्वीट करून सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. ‘दोन्ही देशांदरम्यान सामरिक भागीदारीचा आवाका लक्षात घेऊन सकारात्मक चर्चा झाली. पंतप्रधान बेनेट यांचा सकारात्मक दृष्टिकोन उत्साहवर्धक होता,’ असे ट्वीट त्यांनी केले. ‘बेनेट यांनी केलेली सामरिक उद्दिष्टांची चर्चा महत्त्वाची होती,’ असे ते म्हणाले. दोन्ही देशांतील संबंध पुढील तीस वर्षांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून अधिक घनिष्ट होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा त्यांनी बेनेट यांच्यापर्यंत पोहोचविल्या.

करोना महासाथीकडे दुर्लक्ष; राष्ट्रपतींविरोधात खटला चालवण्याची शिफारस

पंतप्रधान बेनेट यांच्याबरोबर चर्चा करण्यापूर्वी जयशंकर यांनी इस्राईलचे अध्यक्ष इसाक हिरझोग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ कसे होतील, यावर उभयतांत चर्चा झाली. त्यांच्यामध्ये बदलत्या भूराजकीय स्थितीवरही चर्चा झाली. दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने भारताने उचललेल्या पावलांमुळे अध्यक्ष हिरझोग यांनी जयशंकर यांचे या वेळी आभार मानले. ‘दोन्ही देश प्राचीन असून, लोकशाही मार्गाने चालणारे आहेत. जयशंकर यांच्याबरोबर उत्साहवर्धक चर्चा झाली. आमचे ते निकटचे दोस्त आहेत. तंत्रज्ञान, व्यापार, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांत दोन्ही देशांच्या भागीदारीबाबत चर्चेदरम्यान कटिबद्धता दर्शविण्यात आली. दोन्ही देश मिळून खूप काही करू शकतील,’ असे ट्विट हिरझोग यांनी केले.

पश्चिम आशियातील ‘नवे क्वाड’
आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य

इस्राईलचे अध्यक्ष इसाक हिरझोग यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही भाष्य केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही हिरझोग यांच्याबरोबर चर्चा हा एक सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. ‘दोन्ही देशांत सामरिक संबंध प्रस्थापित होऊन तीस वर्षे पूर्ण होण्याकडे वाटचाल सुरू आहे; त्यानिमित्त भारताकडून शुभेच्छा घेऊन मी आलो आहे,’ असे ते म्हणाले. दोन्ही देशांनी द्विस्तरावरील संबंध सामरिक भागीदारीच्या रूपात २०१७मध्ये बदलले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्राईलला भेट दिल्यानंतर दोन्ही देशांनी संबंध सामरिक पातळीवर नेले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here