इक्बालने मशिदीतून कुराणची एक प्रत दुर्गा पूजा मंडपात नेली. त्यानंतर त्याने हनुमानाच्या मंदिराजवळ असलेल्या जमावासोबत चालण्यास सुरुवात केली.
सध्या आरोपी फरार असून त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही. आरोपी इक्बालचा भाऊ, कुटुंबीयांकडून पोलिसांना सहकार्य केले जात आहे. त्याच्या मानसिक स्थितीचा कोणीतरी फायदा उचलून हे कृत्य केले असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
हिंसाचार प्रकरणी कोमिल्ला पोलिसांनी चार प्रकरणे दाखल करून घेतली असून ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील चार जण हे आरोपी इक्बालचे सहकारी आहेत. इक्बाल हा अमली पदार्थाच्या आहारी गेला असल्याचे त्याच्या आईने ‘ढाका ट्रिब्युन’ला म्हटले. जवळपास १० वर्षांपूर्वी शेजाऱ्यांनी त्याच्या पोटात सुरा खुपसल्यानंतर त्याला मानसिक धक्का बसला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times