captain sariya abbasi: captain sariya abbasi : भारताची रणरागिणी! ‘ड्रोन-किलर’ गन्सच्या कमांडर कॅप्टन सरिया अब्बासी यांचे फोटो व्हायरल – captain sariya abbasi deployed at lac in tawang of arunachal pradesh with l 70 anti aircraft gun
नवी दिल्लीः चीनशी LAC वर सुरू असलेल्या तणावादरम्यान अरुणाचल प्रदेशच्या आघाडीच्या चौक्यांवर भारतीय लष्कराच्या ‘ड्रोन-किलर’ गन्सच्या तरुण कमांडर कॅप्टन सरिया अब्बासी यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केलेल्या सरिया अब्बासी या गेल्या चार वर्षांपासून भारतीय लष्कराच्या एअर-डिफेन्स (AD) रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत. सध्या तवांग आणि बुमला दरम्यानच्या अज्ञात ठिकाणी त्या तैनात आहेत.
कॅप्टन सरिया या एडी (एअर डिफेन्स) गन, L-70 गनच्या ट्रूप कमांडर आहेत. सुमारे ३०-४५ वर्षांपूर्वी स्वीडनमधून घेतलेली L-70 AD-गन्समध्ये सुधारणा करत अलिकडेच भारतीय लष्कराने ड्रोनविरोधी गन्सचे स्वरुप दिले आहे. या गन्सचा उपयोग आधी शत्रूची हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने पाडण्यासाठी केला जात होता. आता त्यात सुधारणा (अपग्रेड) केल्यावर त्याचे रूपांतर ‘ड्रोन-किलर’ गन्समध्ये झाले आहे. अपग्रेड करून चे ऑप्टिकल रडार आणि लेझरसह सुसज्ज करण्यात आले आहे.
एलएसीवर चिनी ड्रोनचा वाढता धोका पाहता, भारतीय लष्कराने एलएसी जवळ या L-70 गन्स तैनात केल्या आहेत. कॅप्टन सरिया अब्बासी गेल्या चार वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा करत आहेत. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या आहेत.
कॅप्टन सरिया अब्बासी यांचे वडील डॉ. तहसीन अब्बासी हे ऑल इंडिया रेडिओमध्ये स्टेशन डायरेक्टर म्हणून काम करत होते आणि आता ते निवृत्त झाले आहेत. सरिया यांची आई रेहाना अब्बासी गोरखपूर येथील शासकीय शाळेत प्राचार्य आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times