हायलाइट्स:
- समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून वसुलीचे आरोप
- वानखेडे यांनी घेतली पत्रकार परिषद
- सर्व आरोप फेटाळून लावत दिलं प्रत्युत्तर
‘नवाब मलिक यांनी माझी आई, वडिल आणि बहिणीवर चुकीचे आरोप केले असून मी या आरोपांचं खंडन करतो. ते सांगत असलेल्या तारखेला मी दुबईला गेलेलो नव्हतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा अधिकार असू शकतो, मात्र मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करत आहे. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अॅण्टी ड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो,’ असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
माझ्या बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन त्यांनी हेरगिरी केली आहे, असा आरोपही समीर वानखेडे यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी काय आव्हान दिलं होतं?
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना मावळमधील एका कार्यक्रमात बोलताना खुलं आव्हान दिलं. ‘वानखेडे वर्षभरात तुझी नोकरी जाणार असून, तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची जनताही हे सर्व पाहात राहील. तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणारच आहे. त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. मग कोणत्या बापाच्या सांगण्यावरून हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे ना. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,’ असा इशारा मंत्री नवाब मलिक यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times