आरोपीकडून व्हेल मासा उल्टी (Ambergris ) ६.२ किलो व कार वाहन (क्र. MHOBAN4033) जप्त करून घेतली आहे. वरील सर्व आरोपींच्या विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांनी गुन्हा नोंद केला आहे. व्हेल माशाची उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अँबरग्रीस असे म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या उल्टीतून सुगंधी द्रव्ये (सुगंधी अत्तर, बॉडी स्प्रे इ). करीता मोठया प्रमाणात मागणी असते. त्यामुळे त्याला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते.
व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे अँबरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मादामारकर, मालदीव, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास सुरू असून याचे धागेदोरे हाती लागून तस्कर टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे तपासात स्पष्ट होणार आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times