द्वारे लेखक | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अद्यतनित: 22 ऑक्टोबर 2021, दुपारी 2:01

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) या संस्थेचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी वसुलीचे गंभीर आरोप केले होते.

समेर-वानखेडे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप – प्रत्यारोपांची मालिका वाढतच आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत खळबळजनक आरोप केले होते. मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरुद्धच्या आरोपांची धार कायम ठेवत गुरुवारी आणखी एक धक्कदायक दावा केला आहे. नवाब मलिकांच्या आरोपांचे समीर वानखेडे यांनीही खंडन करत आरोप नाकारले आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यातील वाद नेमके काय आहेत याचा घेतलेला आढावा. नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर केलेले आरोप व समीर वानखेडे यांनी दिलेली उत्तर…

 1. नवाब मलिक– वानखेडे दुबई व मालदीवला जाऊन बॉलिवूड कलाकारांकडून हप्ता वसुली करत होते,असा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला आहे. शिवाय, करोना काळात जेव्हा संपूर्ण बॉलिवूड मालदीवमध्ये होतं तेव्हा वानखेडेदेखील तिथे गेले होते.

 • समीर वानखेडे– नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी कधीच दुबईला गेलो नाहीये. हवं तर नवाब मलिकांनी माझा पासपोर्ट तपासावा. मी मालदीवला जरुर गेलो होतो. मात्र, तेव्हा मी रिसतर सुट्टीची परवानगी घेऊन कुटुंबासोबत गेलो होते. नवाब मलिकांनी केलेले आरोप तथ्यहिन आहेत.

 1. नवाब मलिक– समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर केले होते. मलिक यांच्या म्हणण्यानुसार हे फोटो १० ऑक्टोबर २०२०मधील असून हॉटेल ग्रँड हयातमधील आहेत.

 • समीर वानखेडे– समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचा हा दावा फेटाळून लावला आहे. नवाब मलिकांनी शेअर केलेले फोटो हे दुबईतील नसून मुंबईतील आहेत. त्या दिवशी मी मुंबईत ऑन ड्युटी होतो व रिया चक्रवर्ती प्रकरणाची चौकशी करत होतो, असं उत्तर समीर वानखेडे यांनी दिलं आहे.

 1. नवाब मलिक– समीर वानखेडे यांची नोकरी एका वर्षात जाईल. त्यांच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. जे मी येणाऱ्या काळात सादर करणार आहे. त्यानंतर समीर वानखेडे एक दिवसही नोकरी करु शकणार नाहीत व त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

 • समीर वानखेडे: समीर वानखेडे यांनी म्हटलं की मी एक साधा सरकारी अधिकारी आहे. जर ड्रग्ज कारवाई आणि त्यांचे सेवन करणे आणि त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्यांचं स्वागत करतो, असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

 1. नवाब मलिक: समीर वानखेडे हे बनावट कारवाई करतात व त्याच्या आडून हफ्ते वसुल करतात, असा आणखी एक आरोप नवाब मलिक यांनी केला होता

 • समीर वानखेडे– समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर देत त्यांच्याविरोधात कायदेसीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवाब मलिक माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आरोप करत आहेत. ते एक मोठे मंत्री आहेत व मी एक सरकारी कर्मचारी आहे.

 1. नवाब मलिक– नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला होता. फ्लेचर पटेलला वानखेडे यांनी अनेक प्रकरणात पंच म्हणून नियुक्त केले होते.

 • फ्लेचर पटेल: फ्लेचर पटेल यांनी यावेळी याबाबत स्वःत स्पष्टीकरण दिलं होतं. समीर वानखेडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. तसंच, एनसीबी चांगलं काम करत असून याचा नवाब मलिकांना त्रास होत आहे, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलं होतं.

 1. नवाब मलिक: ज्या दिवशी क्रुझवर कारवाई झाली त्या दिवशी समीर वानखेडे भाजप नेत्याचे नातेवाईक मोहित कंबोज यांना भेटले होते. भाजप नेत्यांच्या नातेवाईकांच्या दबावामुळं त्यांनी काही जणांना सोडून दिलं होतं. तसंच, वानखेडे यांनी आठ नाही तर ११ आरोपी पकडले होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

 • समीर वानखेडे– एनसीबी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. क्रुझवर झालेल्या कारवाईत त्यादिवशी १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील ६ लोकांना सोडून देण्यात आलं होतं. कारण, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता.

 1. नवाब मलिक: एनसीबीने क्रुझवर केलेल्या कारवाईत दोन बाहेरील व्यक्तीदेखील सहभागी होत्या. त्यातील एक केपी गोसावी आणि दुसरा मनीष भानुशाली होते. केपी गोसावी यांच्या चॅटिगच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर, भानुशाली भाजपचे नेते आहेत.

 • समीर वानखेडे– या आरोपांवर समीर वानखेडे आणि एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. ते दोन्ही लोक एनसीबीचे अधिकारी नसून पंच साक्षीदार आहेत.

समीर वानखेडेंचा नवाब मलिकांवर पलटवार; सर्व आरोप फेटाळले!

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गुरुवारी सातत्याने निशाणा साधला आहे, त्यांनी मलिकच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले आहे.
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here