पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसहीत अनेक मोठ्या नेत्यांनीही अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोबतच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्तानं गुजरातच्या अहमदाबादमध्ये मणिपूर गावात सेवा सेतु कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल शुक्रवारी हजर राहणार आहेत. या कार्यक्रमात स्थानिकांना सरकारी कार्यालयात न जाता आपापल्या घरीच प्रमाणपत्र आणि कागदपत्रं मिळण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
अमित शहा गांधीनगरजवळ एका लहानशा माणसा नावच्या गावचे मूळ रहिवासी आहेत. अमित शहा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी मिळवल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात अधिकृतरित्या प्रवेश केला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनुच्छेद ३७० हटवणं, नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच यूएपीए यांसारख्या कठोर कायदे घेतल्याचं दिसून येतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times