हाँगकाँग: हाँगकाँगमध्ये एक घातक संसर्ग फैलावत असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या संसर्गाची लागण झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा संसर्ग मासे अथवा पाण्यातून फैलावला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सागरी खाद्य तज्ज्ञांनी मांस बाजारातून ताज्या पाण्यातील मासे न घेण्याचा, त्यांना हात न लावण्याचे आवाहन केले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये या घातक बी स्ट्रेप्टोकोकस सुक्ष्मजीव संसर्गाचे ७९ प्रकरणे समोर आल्यानंतर इशारा दिला आहे. या अहवालानुसार, संसर्गामुळे किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य सुरक्षा केंद्राने (सीएचपी) गुरुवारी सांगितले की, या संसर्गाची ओळख एसटी२८३ अशी झाली आहे. या संसर्गाची ३२ जणांना लागण झाली आहे. मागील ३० दिवसात जवळपास २६ प्रकरणे समोर आली आहेत. बाधितांची संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक; शाळा बंद, विमान सेवा स्थगित

चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याने चुकून गोळी झाडली; सिनेमॅटोग्राफर ठार, दिग्दर्शक जखमी
दरम्यान, चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्गाने डोके वर काढले आहे. करोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर काही भागातील विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here