अकोला: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सलीम, युनुस यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे तेल्हारा शहरात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून असंख्य कार्यकर्तेदेखील वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार आहेत.
खरंतर, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात निवडणुकांच्या वादळामुळे राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशात आता अकोल्यामध्ये कुठेतरी वंचितची ताकद वाढताना दिसत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times