मुंबई: ‘कोकणचं निसर्गसौंदर्य हे आपलं वैभव आहे. ते जगापुढं आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व योजना सरकार आखत असून पाणबुडी प्रकल्प हा त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे. पाणबुडीत बसून समुद्री जीवन () दाखवण्याची ही योजना आहे आणि ती कोकणातूनच सुरू होईल, अशी घोषणा (CM ) यांनी आज विधानसभेत केली.

कोकणच्या प्रश्नांसंदर्भातील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ‘कोकण हा नेहमीच आमच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. कोकणचा समुद्र किनारा, तेथील वनराई व अन्य निसर्गसंपदा हे वैभव आहे. ते जगापुढं यावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटकांना तिथं येण्यासाठी ज्या काही सुविधा हव्यात त्या देण्याचा प्रयत्न आहे. रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काँक्रिटचे तर, काही ठिकाणी इतर प्रकारचे पक्के व टिकाऊ रस्ते बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चिपी विमानतळाचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या १ मे रोजी, महाराष्ट्र दिनी हे विमानतळ सुरू व्हायलाच पाहिजे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ‘कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पाण्याखालचं जग दाखवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच पाणबुडी योजना आणत आहोत. त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं ठाकरे यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

>> कोकणचा असा विकास करू की कॅलिफोर्नियानं म्हटलं पाहिजे की आम्हाला कॅलिफोर्नियाचा कोकण करायचा आहे.

>> कोकणात सिंधुदुर्ग, जलदुर्ग, विजयदुर्ग, पूर्णगड असे अनेक गड आहेत. कुलाब्यापासून सुरुवात करून या सर्व दुर्गांची सफर करता यावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

>> संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी येत्या एप्रिलमध्ये कोकणात व्हायरॉलॉजी लॅब सुरू केली जाईल.

>> आवश्यक तिथं रुग्णालयेही उभारणार

>> कोकणातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवणार

>> रस्त्यांची कामे जलदगतीनं पूर्ण केली जातील.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here