१. ही एक केंद्रीकृत मालमत्ता आहे. आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही नियम आखलेले नाहीत. सरकारकडूनही या संदर्भात आतापर्यंत कोणताही हस्तक्षेप झालेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे त्यांच्या गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण असते.
२. संपूर्ण जगात क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जाते. हे कोणत्याही देशाच्या सीमांवर विभागलेले नाही. जर तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी असेल, तर तुम्ही ती संपूर्ण जगात न घाबरता वापरू शकता.
३. क्रिप्टो एक्सचेंज २४ तास आणि ७ दिवस काम करतात. स्टॉक मार्केट एक्स्चेंजप्रमाणे, ते आठवड्यातून फक्त पाच दिवस आणि सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३५ पर्यंत काम करत नाहीत. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणताही बदल करू इच्छितो, तेव्हा करू शकतो. तो खरेदी आणि विक्री करू शकतो.
या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
१. क्रिप्टोकरन्सीला कोणत्याही वित्तीय संस्थेचे समर्थन नाही. तसे ते नियमन केलेले नाही. यामुळेच एखादा गुंतवणूकदार यात अडकला, तर त्याला मदत करणारे कोणीच नसते. जर तुमची फसवणूक झाली, तर कोणताही आधार नाही. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची स्वत:ची आहे.
२. ही एक डिजिटल मालमत्ता आहे. अशा परिस्थितीत सायबर गुन्हेगार ते हॅक करू शकतात आणि ते तुमच्या वॉलेटमधून चोरू शकतात. हा सर्वात मोठा धोका आहे. जगातील आघाडीच्या डझनभर गुंतवणूकदारांनी आणि उद्योगपतींनी याचा उद्याचे भविष्य असा उल्लेख केला आहे. असे असूनही त्यापासून अंतर ठेवण्याची गरज आहे. अर्थतज्ज्ञ शिफारस करतात की, जर तुम्हाला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोर्टफोलिओचा एक छोटासा भाग यात ठेवा.
३. क्रिप्टोकरन्सीची दुसरी समस्या म्हणजे अस्थिरता. त्याची किंमत खूप लवकर वाढते आणि खूप लवकर घसरते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकीच्या वेळी एन्ट्री केली, तर घाबरण्याची गरज नाही. योग्य वेळेची वाट पाहा आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार बना.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times