दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) शुल्क आणि अग्रिम प्रक्रिया शुल्कावर (अपफ्रंट प्रोसेसिंग फी) १०० टक्के सूट दिली जात आहे. लोकांसाठी गृहनिर्माण वित्त योजना- पीएनबी मॅक्स-सेव्हर (PNB Max-Saver). सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएनबी प्राइड हाऊसिंग लोन, सामान्य नागरिकांसाठी गृहकर्ज आणि पीएनबी जनरल- नेक्स्ट हाऊसिंग फायनान्स योजना.
पीएनबी गृहकर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, ग्राहकांना पीएनबीच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर लॉग इन करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘कर्ज’ (लोन) पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर त्यांना ‘गृहनिर्माण कर्ज’ (हायसिंग लोन) पर्याय निवडावा लागेल.
‘गृहकर्जासाठी ऑनलाईन अर्ज’ (Apply online for housing Loan) हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला ‘हाउसिंग लोन न्यू अॅप्लिकेशन’ (Housing Loan new Application) निवडावे लागेल. ओटीपी पडताळणीच्या पुढील टप्प्यासाठी, अर्जदाराला पहिले नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ‘जनरेट ओटीपी’ वर क्लिक करावे लागेल. अधिक तपशीलांसाठी ग्राहक पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times