नवी दिल्ली : फ्लिपकार्टच्या मालकीच्या मिन्त्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमर नागरम यांनी शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला. नागरम यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी मिंत्रा या फॅशन ई-कॉमर्स कंपनीत सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. मीडिया रिपोर्टनुसार, नागरम यांची जानेवारी २०१९ मध्ये मिन्त्राचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजीनामा दिल्यानंतरही ते कंपनीशी संबंधित राहणार आहेत. यापुढे नागरम हे सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी शुक्रवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, “मिन्त्रा (मिंत्रा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमर नागरम एक मजबूत समर्थक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्राहकांना अधिक आकर्षक आणि वैयक्तिक फॅशन अनुभव प्रदान केला आहे. जवळजवळ तीन वर्षे मिन्त्राचे नेतृत्व केल्यानंतर अमरने स्वतःचा उपक्रम सुरू करण्यासाठी फ्लिपकार्ट समूह सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”

महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’
Home Loan: ‘ही’ सरकारी बँक गृहकर्जावर देतेय बंपर ऑफर; जाणून घ्या सविस्तर
कृष्णमूर्ती पुढे म्हणाले की, “तुमच्यापैकी अनेकांना माहित आहे की, अमर जवळपास १० वर्षांपासून या गटाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांनी त्यांच्या वर्तमान भूमिकेपूर्वी फ्लिपकार्टवर विविध गटांचे नेतृत्व केले आहे आणि आम्ही संघात त्यांची कमी जाणवेल. आठवण काढत राहू.”

नागरम फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कृष्णमूर्ती यांना रिपोर्ट करायचे. मिन्त्राला दुसरा सीईओ मिळेपर्यंत नागरम कंपनीत (डिसेंबर अखेरपर्यंत) राहतील आणि सल्लागार म्हणून काम करतील

Citi Bank: ‘ही’ विदेशी बँक खरेदी करण्याची शर्यत; HDFC, अॅक्सिस, कोटक महिंद्रा यांमध्ये जोरदार स्पर्धा
महागाईचा परिणाम; तब्बल १४ वर्षांत पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here