हायलाइट्स:

  • ‘खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात’
  • भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा हल्लाबोल
  • पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका

जळगाव : ‘जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असलं तरी राज्य सरकारने अजूनही मदत न दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार आहे. राज्यातील खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे,’ असा हल्लाबोल भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Raut: ‘तुमचं सरकार घालवल्यापासून आम्हालाही शांत झोप लागतेय’

यावेळी खासदार पाटील म्हणाले की, आता दिवाळीत मातोश्री, विधानभवनावर रोषणाई होईल तर दुसरी शेतकरी अंधारात राहिल्याचे चित्र आहे. राज्यातील असंवेदनशील ठाकरे सरकार शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाकरे सरकारला खरोखर शेतकऱ्यांचा कळवळा असेल तसंच त्यांच्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेबर ठाकरे यांचे रक्त असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. शेतकऱ्यांना आता वेगळी मदत म्हणून मशागतीसाठी हेक्टरी ४० हजार रुपयांची मदत करण्याची मागणीही खासदार उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

पीकविम्यावरुन टीका

पीक विमा योजनेंतर्गत करोडो रुपयांचा विमा हप्ता भरला जात असला तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. त्याचे निकष राज्य सरकारने बदलल्याने हे सरकार विमा कंपनीसाठी की शेतकऱ्यांसाठी काम करते? असा सवाल खासदार पाटील यांनी केला. १४७ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम केवळ २८ कोटी रुपयेच मिळाली. याआधी भाजप सरकारच्या काळात ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोपही उन्मेष पाटील यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here