‘या अध्यादेशात राज्यातील जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमध्ये राज्यातील विविध उद्योजकांना किंवा उद्योजक संघटनेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादहून राम भोगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावापुढे संभाजीनगर-औरंगाबाद असा उल्लेख करण्यात आला आहे. हा आदेश २२ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला. यात एकूण पाच जणांची निवड करण्यता आली आहे. यात मुंबईहून नितीन पोतदार, मुंबईतूनच प्रशांत गिरबने, प्रसन्न सरंबळे, औरंगाबादहून राम भोगले, नागपूरहून सुरेश राठी यांचा समावेश आहे. ही समिती राज्यात जागतिक गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून काम करणार आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सहसचिव रविंद्र गुरव यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आला आहे. या प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘औरंगाबाद शहराच्या नावाबद्दल गेल्या २१ वर्षांपासून राजकारण करण्यात येत आहे. आताही हा मुद्दा काढून सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठवाड्यात तसंच औरंगाबादेत चांगला पाऊस झालेला असतानाही लोकांना आठ दिवसानंतर पाणी का मिळते? याबाबत सर्वसामान्यांनी प्रश्न विचारू नये म्हणून ही कुरघोडी करण्यात आलेली आहे,’ असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times