मेक्सिको शहर: मेक्सिकोच्या तुलुम शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीयासह दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर, तीनजण जखमी झाले. मृतकांमध्ये दोन महिला असून यामध्ये जर्मनी आणि भारतीय महिलेचा समावेश आहे. तर, जखमींमध्ये दोन जर्मन आणि एक नेदरलँडच्या नागरिकाचा समावेश आहे.

बुधवारी ही दुर्देवी घटना घडली. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन गटातील वादातून हा गोळीबार झाला. रेस्टॉरंटबाहेरील मोकळ्या जागेत टेबल-खुर्ची लावले होते. या ठिकाणी काही ग्राहक जेवत होते. गोळीबाराच्या घटनेत या ग्राहकांना प्राण गमवावा लागला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसऱ्या महिलेने रुग्णालयात प्राण गमावले. एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. जखमींबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्याने चुकून गोळी झाडली; सिनेमॅटोग्राफर ठार, दिग्दर्शक जखमी

भारतीय स्प्रेमध्ये आढळला घातक जीवाणू; दोघांचा मृत्यू
या गोळीबाराच्या घटनेत प्राण गमावणारी भारतीय वंशाची महिला कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्य करत होती. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती मेक्सिकोमध्ये आली होती. भारतीय महिलेचे नाव अंजली रयोत आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. अंजली ही मूळची हिमाचल प्रदेशची आहे. कॅलिफोर्नियामध्ये ती सॅन जोसमध्ये वास्तव्य करत होती. अंजली २२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी तुलुम येथे दाखल झाली होती.

बांगलादेश: रोहिंग्या निर्वासित छावणीवर अंदाधुंद गोळीबार, सात ठार
कुटुंबीयांना शोक अनावर

अंजलीच्या मृत्यूची बातमी समजताच हिमाचल प्रदेशमधील कुटुंबामध्ये शोककळा पसरली. अंजलीचा भाऊ आशिष यांनी तुलुमच्या महापौरांना मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. अंजली आपला ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी पती उत्कर्ष श्रीवास्तवसोबत मेक्सिकोमध्ये गेली होती. मागील तीन-चार महिन्यापासून ती कुटुंबीयांसोबत राहत होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here