नागपूर: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस () यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बँकेत (Axis Bank) वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव, गृह विभाग आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावली. सर्व प्रतिवादींना आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करायचे आहे.

वाचा:

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. राज्य सरकारने ११ मे २०१७ रोजी एक परिपत्रक काढून राज्यातील पोलिसांची बँक खाती तसेच संजय गांधी निराधार आवास योजनेच्या लाभार्थ्यांची खाती खासगी बँकेमध्ये उघडण्यास सांगितले. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बँकेला मुद्दाम झुकते माप दिले. मुख्य म्हणजे या निर्णयाचा आर्थिक फटका राष्ट्रीय बँकांना बसल्याचा दावा, याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात फडणवीस यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी, याचिकाकर्त्याने केली आहे.

वाचा:

याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत गुरुवारी फडणवीस यांच्यासह अन्य तीन प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here