मॉस्को: रशियामध्ये दिवसभरात ३५,६६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या आधीच्या २४ तासांतील ३७,६७८ या रुग्णसंख्येपेक्षा रविवारची रुग्णसंख्या कमी आहे. रशियातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८२ लाख ४१ हजार ६४३ इतकी झाली आहे, असे रशियातील प्रशासनाने रविवारी सांगितले.

रशियातील ८५ प्रांतांमध्ये गेल्या २४ तासांत ३५,६६० रुग्ण सापडले आहेत. त्यातील ३,१४३ रुग्णांना (८.८ टक्के) लक्षणे जाणवत आहेत, असे रशियातील प्रशासनाने सांगितले आहे. रशियातील रुग्णंसख्या वाढीचा दर ०.४३ टक्के इतका झाला आहे. मॉस्कोमध्ये सर्वाधिक ५,२७९ नवीन करोनारुग्ण सापडले आहेत. यापूर्वीच्या २४ तासांत मॉस्कोत ७,८०३ करोनारुग्ण आढळले होते. सेंट पीटर्सबर्ग येथे २४ तासांत ३,२९७ नवीन करोनारुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रशियात दिवसभरात १,०७२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत दोन लाख ३० हजार ६०० करोनामृत्यू झाले आहेत.

चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक; शाळा बंद, विमान सेवा स्थगित

चिंता वाढली! हाँगकाँगमध्ये नवा संसर्ग, सात जणांचा मृत्यू; सतर्कतेचा इशारा
सेंट पीटर्सबर्ग मध्य लॉकडाउन

रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे ३० ऑक्टोबर ते सात नोव्हेंबरदरम्यान लॉकडाउन लागू केला जाणार आहे. करोनारुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनदरम्यान शहरातील रेस्टॉरंट, कॅफे आणि अत्यावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. गव्हर्नर अॅलेक्झांडर बेगलोव्ह यांनी शनिवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here