इस्लामाबाद: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थ सेवनाच्या आरोपावरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. या घटनेचे भारतात पडसाद उमटत असताना पाकिस्तानमध्येही याची चर्चा सुरू आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असल्याने त्याला त्रास दिला जात असल्याचे पाकिस्तानमध्ये म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या एका निवेदकाने शाहरुख खान याने कुटुंबासह पाकिस्तानमध्ये स्थायिक होण्याचा अनाहूत सल्ला दिला आहे.

पाकिस्तानमधील अनेक सेलिब्रेटी, कलाकारांनी शाहरुख खानला पाठिंबा दर्शवला आहे. आर्यन खानच्या अटकेवर निवेदक वकार झाका यानेही ट्विट केले आहे. झाका याने ट्वीट करून शाहरूख खानला भारत सोडून पाकिस्तानमध्ये स्थायिक होण्याची विनंती केली आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून वाईट वागणूक मिळत असून मी शाहरूख खान सोबत असल्याचे वकार झाका याने म्हटले. वकार झाकाच्या या ट्वीटची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. तर, काहींनी पाठिंबा दिला आहे.

एका युजरने शाहरूख खानच्या समर्थनात ट्वीट केले. शाहरूख खान याची पत्नी हिंदू आहे आणि तो हिंदू सणही साजरा करतो. जो व्यक्ती आपल्या पत्नीच्या धर्माचा सन्मान करतो ती चांगली व्यक्ती असल्याचे दिसून येते. काही युजर्सने वकार झाका यांना पाकिस्तान चित्रपटसृष्टीच्या हलाखीच्या परिस्थितीची आठवण करून दिली.

आर्यन खान प्रकरण : ‘नवे पुरावे गंभीर, सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी’
फुरकान नावाच्या एका युजरने म्हटले की, शाहरुख खानला पाकिस्तानमध्ये चित्रपट मिळणार नाहीत. आपल्या चित्रपटसृष्टीची परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे. चांगल्या कथेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तर, साद नावाच्या युजरने म्हटले की, शाहरूख खान यांना चित्रपट मिळणे तर दूर येथील सगळे निर्माते एकत्र आले तरी शाहरूखला चित्रपटाचे मानधन देऊ शकत नाहीत.

Aryan Khan: आर्यन खान प्रकरणाबद्दल विचारताच जावेद अख्तर यांनी केला ‘हा’ सवाल
पाकिस्तानमध्ये काहींकडून आर्यन खानच्या प्रकरणाला धर्माच्या नजरेतून पाहिले जात आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने काही दिवसांपूर्वी एक लेख प्रकाशित केला होता. यामध्ये आर्यन खानला अटक म्हणजे भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम अभिनेत्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. आर्यन खान प्रकरणाला वाजवीपेक्षाही अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या लेखात नमूद करण्यात आले होते. भारतात मुस्लिमांसोबत भेदभाव वाढत असल्याचे हे आर्यन खान प्रकरणावरून दिसत असल्याचे या लेखात म्हटले होते.

शाहरुख

‘शाहरुख खानने भारत सोडून कुटुंबासह पाकिस्तानात यावं’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here