हायलाइट्स:
- भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० मॅच
- क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानकडून भारतीय टीमचा पराभव
- इंजिनिअरिंग महाविद्यालयात काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला
ही घटना पंजाबच्या संगरुरमध्ये ‘भाई गुरु दास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी’ महाविद्यालयाच्या हॉस्टेल इमारतीत घडली. इथे अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप होतोय.
‘आम्हीही भारतीय आहोत’
‘फ्री प्रेस काश्मीर’नं दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचं फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारणही करण्यात आलं. आपल्यावर रॉड आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप या व्हिडिओत काश्मिरी विद्यार्थ्यांनी केला. मारहाण करणारे विद्यार्थी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करताना त्यांनी ‘पाकिस्तानी’ म्हणवून हिणवत होते.
‘आम्ही इथे मॅच पाहत असताना यूपी वाले आमच्यावर तुटून पडले. आम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत आणि आम्हीही भारतीय आहोत. तुम्हीही पाहू शकता आम्हाला काय वागणूक देण्यात येतेय. आम्ही भारतीय नाहीत का? मोदीजी यावर काय बोलणार?’ असा प्रश्न या काश्मिरी विद्यार्थ्यांनी विचारलाय.
दुसऱ्या बाजुनं काश्मिरी विद्यार्थ्यांनी भारताच्या पराभवाचं सेलिब्रेशन केल्याचा आरोप करण्यात येतोय.
महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार
स्थानिकांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर काश्मिरी विद्यार्थी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडेही आपली तक्रार नोंदवली आहे. या घटनेत सहा विद्यार्थी जखमी झाल्याचं समजतंय.
पोलिसांत तक्रार दाखल
जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांकडून पंजाब पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलंय.
भारत विरुद्ध पाकिस्तान T20
भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्डकप टी २० मॅचमध्ये भारताला १० विकेटनं पराभव स्वीकारावा लागला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times