करोनामुळे नियोजित भूमिपूजन कार्यक्रम घेता आला नव्हता. त्यामुळे आता येत्या ३० ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम पंढरपुरातील रेल्वे मैदानावर होत आहे. या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर धर्मपुरी ते जेजुरी लोणंद, लोणंद ते दिवे घाट, दिवे घाट ते हडपसर असा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आहे. तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये पाटस ते तोंडले बोंडले १३० किलोमीटरचा रस्ता इंदापूर ते तोंडले- बोडले असा ४६ किलोमीटरचा रस्ता, पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर या रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा ९६५ तर पंढरपूर ते आळंदी या संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ९६५ जी असा क्रमांक आहे. सध्या वाखरी ते मोहोळ ४४ किलोमीटर, वाखरी ते खडूस ३० किलोमीटर खुसी धर्मपुरी ४० किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. याच भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. असंही प्रशांत परिचारक यांनी सांगितले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times