हायलाइट्स:
- बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सेटवर केला हल्ला
- दिग्दर्शकाच्या चेहऱ्याला फासली शाई
- स्वरा भास्करला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
‘पाहिले न मी तुला’ मधील अभिनेत्रीला पितृशोक, शेअर केली भावुक पोस्ट
रविवारी लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजच्या सेटवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. सीरिजचं चित्रीकरण सुरू असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते जबरदस्ती सेटवर घुसले आणि त्यांनी प्रकाश यांच्यासोबत वाईट वर्तणूक केली. सोबतच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी तिथे उपस्थित टीममधील अनेकांना पकडून मारहाणही केली. या घटनेचा निषेध म्हणून स्वराने ट्विट करत लिहिलं, ‘आश्चर्यकारक, लाजिरवाणी आणि पूर्णपणे अविश्वसनीय घटना. नव्या भारतात कुणीही सुरक्षित नाहीये… एखाद्या समूहाला मारून मारून तिचा जीव घेण्याच्या घाणेरड्या संस्कृतीने आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवलंय जिथे कधीही कुणावरही कशासाठीही हल्ला केला जाऊ शकतो. हे खूपच भयानक आहे.’

स्वराच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एका युझरने लिहिलं, ‘दीदी तुला हे ट्विट करायला किती पैसे मिळाले?’ तर दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘तुला भारतात भीती वाटते तर पाकिस्तानमध्ये का जात नाहीस? यापूर्वीही गुरुग्राम येथे नमाज वाचणाऱ्या समूहाला पकडून त्यांच्याकडून जय श्री राम वदवून घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेसही स्वराने ट्विट करत या गोष्टीचा निषेध केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times