कराचीत पोलीस कर्मचारीदेखील जखमी
कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री विजयोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार करण्यात आला. या दरम्यान, अज्ञातांच्या गोळीबारात एका पोलीस उपनिरिक्षकासह १२ जण जखमी झाले होते. कराचीतील ओरंगी टाउन सेक्टर-४ आणि ४के चौरांगी भागात अज्ञात ठिकाणांहून झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. गुलशन-ए-इक्बालमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना एका पोलीस उपनिरिक्षकाला गोळी लागली.
इम्रान खान यांच्याकडून शुभेच्छा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि १९९२ चे विश्वचषक विजेते माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट करत म्हटले की, पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आझमचे अभिनंदन त्याने संघाचे नेतृत्व केले. रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही चमकदार कामगिरी केली. देशाला तुमचा अभिमान आहे.’ टी-२० विश्वचषकापूर्वी इम्रान खान यांनी संघाची भेट घेतली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीदेखील संघाचे अभिनंदन केले. हा पहिला विजय आहे, सर्वात आश्चर्यकारक, पण आता प्रवास सुरू झाला आहे, हे लक्षात ठेवा. सर्व पाकिस्तानींसाठी अभिमानाचा क्षण आणि आनंद लुटण्यासाठी हा क्षण दिलेल्या खेळाडूंचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times