हायलाइट्स:
- भाडेवाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
- १७ टक्के भाडेवाढ होणार
- आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नुकतीच दरवाढ केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाकडूनही दरवाढीबाबत विचार केला जात होता. या पार्श्वभूमीवर अखेर महामंडळाने आज मध्यमरात्रीपासून तिकिटांचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवाढीवर काय आहे महामंडळाचं स्पष्टीकरण?
‘केंद्र सरकारचं डिझेल दरावर नियंत्रण नसल्याने हे दर सातत्याने वाढत आहेत. परिणामी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे,’ असं स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलसह अन्य गोष्टी महाग झाल्याने आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशातच आता एसटीचा प्रवासही महागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times