मुंबईकरांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेपासून सर्व लोकल फेऱ्या सुरू होणार! – big news for mumbaikars; central and western railways have decided to start all local trains.
मुंबई : राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि अनेक गोष्टींवरील बंधने हटवण्यात आली. मात्र मुंबई लोकलच्या (मुंबई लोकल) मर्यादित फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता २८ ऑक्टोबरपासून सर्व लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा
मध्य आणि पश्चिम रेल्वेने १०० टक्के लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरीही राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे आगामी काळातही मुंबईत लोकल प्रवासासाठी हीच अट लागू असणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
The treatment for hyponatremia is chosen on the basis of duration and symptoms cialis from india