हायलाइट्स:

  • पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या ३० जागांसाठी निवडणूक होणार
  • निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी
  • नागरी क्षेत्रात २२ जागांसाठी २३ नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या ३० जागांसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या मोठ्या नागरी क्षेत्रात २२ जागांसाठी २३ नगरसेवक हे निवडणुकीच्या रिंगणात रहिल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. या नगरसेवकांना अवघा चार महिन्यांचा कालावधी मिळणार असला, तरी निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

नगरपालिका क्षेत्रात एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज बाद ठरवलेल्या उमेदवाराने अपिल केल्याने त्यावर आज, मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी तीनपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्राचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू; अँटॉप हिलच्या सीजीएस काॅलनीतील घटना

या निवडणुकांसाठी सोमवारी अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत होती. ३० जागांसाठी १०८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या मोठ्या नागरी क्षेत्रासाठी अर्ज केलेल्या २७ नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात राहिले. एका उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने या क्षेत्रासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.

aryan khan case : दिल्लीत दाखल होताच समीर वानखेडे म्हणाले….

नगरपालिका क्षेत्रासाठी एका जागेसाठी पाच उमेदवार होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सात जागांसाठी ७५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला. संबधित उमेदवाराने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे अपिल केलं आहे. त्यावर मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here