हायलाइट्स:

  • नगरनाका येथे आणखी एक विचित्र घटना
  • शिवशाही बसच्या चालकाने प्लास्टिकच्या खुर्च्या तोडल्या
  • पालिकेच्या कर्मचाऱ्यांना थेट मध्यवर्ती बस स्थानकात आणून सोडले

औरंगाबाद : करोना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचे झाल्टा फाटा येथून करण्यात आलेल्या अपहरणाचं प्रकरण ताजे असतानाच नगरनाका येथे आणखी एक विचित्र घटना घडली आहे. करोना चाचणी कॅम्पच्या परिसरात ठेवलेल्या खुर्च्यांवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या चालकाने बस घालून प्लास्टिकच्या खुर्च्या तोडल्या. तसंच या बसच्या चालकाने चाचणीचे आवाहन करण्यासाठी बसमध्ये गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना थेट मध्यवर्ती बसस्थानकात आणून सोडल्याची घटना आज सोमवारी घडली आहे.

शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर महापालिकेतर्फे करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नगर नाका येथील गोलवाडी फाटा येथे पालिकेचं एक करोना चाचणी केंद्र आहे. या केंद्रात पुणे, नगर मार्गे येणाऱ्या नागरिकांची करोना चाचणी केली जात आहे.

भात पिकाला वारे देताना घडली दुर्घटना; पंखा तुटून डोक्यात लागल्याने तरुणाचा मृत्यू

करोना चाचणीसाठी पुणे, नगरहून येणारी वाहने थांबवली जातात. सोमवारी सकाळी पुणे-औरंगाबाद ही शिवशाही बस (एमएच ११-टी-९२४६) आली. गोलवाडी फाटा येथील केंद्रावरील कर्मचारी अमोल खाडेकर व लॅब टेक्निशियन अक्षय शेळके यांनी ती बस थांबवली व बसमध्ये जाऊन प्रवाशांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन करण्यासाठी खाडेकर व शेळके बसमध्ये शिरले. त्यांना बसच्या चालकाने विरोध केला आणि बसचे दार बंद करुन बस थेट मध्यवर्ती बसस्थानकात आणली, अशी माहिती खाडेकर व शेळके यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, या घटनेबद्दल दोन्हीही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here