या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी खार्टूम व बाजूच्या ओमदुर्मन शहरात नागरिक लष्कराच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्ते रोखण्यासह अनेक ठिकाणी टायर जाळल्याचे व त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी आश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केल्याचे ऑनलाइन शेअर करण्यात आलेल्या चित्रीकरणात दिसत आहे.
सत्तापालटाचा विरोध करण्याचे आवाहन
लोकशाही समर्थक असलेला पक्ष सुडनीज प्रोफेशनल एसोसिएशनने लोकांना रस्त्यावर उतरून सत्तापालटाचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी रस्त्यावर उतरावे आणि त्याचा ताबा घ्यावा असे आवाहन पक्षाच्यावतीने सोशल मीडियावर करण्यात आले. तर, सुदान कम्युनिस्ट पक्षानेही या सत्तापालटाचा विरोध केला आहे. लष्कराने पूर्ण सत्तापालट केला असल्याचे पक्षाने म्हटले. कामगारांनी-कष्टकरी वर्गाने संपावर जाण्याचे आवाहन कम्युनिस्ट पक्षाने केले आहे. लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
जगभरातून चिंता व्यक्त
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भव्य निदर्शनांनंतर दीर्घकालीन हुकूमशहा ओमर अल-बशीर याला पदच्युत केल्यापासून लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या सुदानचा ताबा पुन्हा लष्कराकडे जाणे हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका आणि अरब लीगने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times