हायलाइट्स:

  • शेतकरी कन्येचे बिबट वाघाशी दोन हात
  • बिबट्याने कडाडून पकडला गळा तरीही कळशीने फोडलं त्याचं डोकं
  • फार्मसीच्या विद्यार्थीनीचं धाडस

यवतमाळ : शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या महिलांवर बिबट्याने झेप घेतली यातच एका तरुणीचा गळा आपल्या जबड्यात पकडला. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून त्याला जेरीस आणले. अखेर माता फुटलेल्या बिबट्याने जंगलात पळून गेला ही थरारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड शिवारात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

मृत्यू पुढे आलेल्या या बिबट्याला पिटाळून लावणाऱ्या या धाडसी तरुणीचे नाव वृषाली निळकंठ ठाकरे असे आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करंजखेड गावातील महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. काम सुरू असताना या मजूर महिलांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी वृषाली एकटीच शेताच्या जवळच्या ओढ्यावर गेली. पाण्याची कळशी भरून परत येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठीमागून झेप घेतली. प्रसंगी तिच्या जिवावर बेतला होता. मात्र, वृषालीने हार मानली नाही.

बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्…
वृषालीची मान बिबट्याने जबड्यात पकडली होती. कोणत्याही क्षणी तिचा जीव जाणार होता. मात्र, हुशारीने हाताची कळशी घेऊन तिने बिबट्यावर प्रहार सुरू केले. वृषालीच्या कळशीचे तीन-चार दणके बिबट्याचा कपाळावर बसले. बिबट्या गोंधळून गेला. मात्र, वृषालीने एका पाठोपाठ एक त्याच्या माथ्यावर प्रहार सुरू ठेवले. अखेर भांबावलेल्या बिबट्याने वृषालीची मान सोडून थेट जंगलाकडे पोबारा केला.

या झटापटीत वृषालीच्या पायावर गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे तिला उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. या बिबट्याची परिसरात चांगली दहशत आहे. येथील मजुर शेतात जाण्यास घाबरु लागले आहेत. मात्र शेतकरी कन्येने दाखवलेले धाडस सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. परिसरात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करंजखेड येथील गावकरी करीत आहे.

समीर वानखेडेंनी स्वत:चं जात प्रमाणपत्र प्रसिद्ध करावं, नाहीतर… नवाब मलिक यांचं आव्हान

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here