नवरात्रौत्सवा दरम्यान हिंदू मंदिरे, दुर्गा पूजा मंडपांची धर्मांध कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, नासधूस करण्यात आली होती. बांगलादेशमधील विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात हिंदू समुदायाच्या घरांवरही हल्ले करण्यात आले. या दंगलीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी दोषीवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
पीरगंज पोलीस ठाणे प्रभारी सुरेशचंद्र यांनी सांगितले की, आरोपी मामुन याने हिंसाचाराच्या रात्री पेट्रोल टाकून आग लावली होती. नवखालीमध्ये हिंदू समुदायाविरोधात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या एका नेत्यासह ११ जणांना अटक केली. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी शैकत मंडलसह ६८३ जणांना अटक केली आहे.
मुख्य आरोपीची कबुली
हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शैकत मंडल याने रविवारी मॅजिस्ट्रेटसमोर गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे वृत्त आहे. त्याच्याच फेसबुक पोस्टमुळे १७ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा दरम्यान पीरगंज उपजिल्ह्याच्या रंगपूरमध्ये हिंसाचार झाला होता. मंडलचा सहकारी रबीउल इस्लाम (वय ३६) मौलवी आहे. त्याच्याविरोधात आग लावणे, लुट करणे आदी आरोप आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times