मागच्या वर्षी करोनामुळे सर्वसण उत्सव आणि मंदिरे बंद असल्याने फुलशेतीला मागणी पाहिजे. त्या प्रमाणात नव्हती. मात्र, यावर्षी करोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे मंदिर खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढली आहे. यावर्षी वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे झेंडूच्या फुलावरती करपा सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.
फुलं टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त औषध फवारणीदेखील करावी लागत आहे. त्याच बरोबर या करपा रोगामुळे उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळी उत्सवामध्ये झेंडूच्या फुलशेतीला मागणी वाढणार असून फुलांचे भाव देखील वधारण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times