रत्नागिरी : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच राजकीय वातावरण तापलं असताना आता रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खरंतर, निवडणुकांचे वारे फिरल्यापासून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू झालं आहे. अशात दापोलीत संदिप राजपुरे आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. याचा भविष्यात शिवसेनेला नक्कीच फटका बसेल अशी चर्चा आहे.

अधिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेडमध्ये गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तर हे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश निश्चित झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
आर्यन खानच्या अडचणी वाढणार? जामिनावर सुनावणीआधीच NCB चा कोर्टापुढं ‘हा’ दावा
कोणी दिला राजीनामा?

राजपूरे – दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख

शंकर कांगणे – उपजिल्हा प्रमुख

विकास जाधव – युवासेना उपतालूका प्रमुख

दत्ताराम गोठल – तालूका प्रमुख, खेड
बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्…

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here