बुलडाणा : नको तिथे वेडेपणाचे धाडस एक युवकाच्या जीवावर बेतणारे ठरले आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील धामणगांव येथील राजू वसंता महाले या २२ वर्षीय युवकाचा सापाला पकडण्याच्या मोहापायी सर्पदंशामुळे दुर्देवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

या युवकाच्या घरासमोर मण्यार जातीच्या नर व मादीचा प्रणयक्रीडा सुरू असल्याचे परिसरातील काही नागरिकांचे निदर्शनास आले. उपस्थित नागरिकांमधील राजू या युवकाने सापांना पकडण्याचे वेडे धाडस केले आणि जे नको व्हायचं तेच झालं. साप पकडण्याचे कोणतेच प्रशिक्षण घेतले नसताना किंवा साप कसा पकडायचा याची साधी माहितीही नसताना साप पकडण्याच्या प्रयत्नात सापांनी सदर युवकास चार ठिकाणी चावा घेतला.
बापरे! उद्धव ठाकरे घरी असताना कॉम्पलेक्समध्ये होता ८ फूट लांब अजगर, अन्…
यामुळे सापाचे विश पूर्ण शरीरात भिनले. उपस्थित नागरिकांनी राजुला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजूने सापांना पकडण्याचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नसल्याची माहिती समोर आली. अनेकदा नागरिक कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना विषारी जातीच्या सापांना पकडण्याचे वेडे धाडस करतात व आपला जीव गमावतात.
बुलडाण्यात ३ वाहनांचा विचित्र अपघात, ४ जण जागीच ठार तर ७ गंभीर जखमी

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here