भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये महिला टी-२० वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. भारतीय संघाला पुढे चाल देण्यात आल्यामुळे त्यांनी फायनल गाठली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर अंतिम फेरीत पोहोचण्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. कारण त्यांनी उपांत्य फेरीचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठली आहे, दुसरीकडे एकही चेंडू न खेळता भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे अंतिम फेरीत ही गोष्ट बघितली जाणारा का, याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम आहे.
वाचा-
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये पावसाचे सावट आहे. त्यामुळेच भारताचा उपांत्य फेरीचा सामना रद्द करावा लागला होता. महिला टी-२० वर्ल्डकपची फायनल रविवारी ८ मार्चला खेळवण्यात येणार आहे. या दिवशी जर पाऊस पडला तर नेमका काय निर्णय घ्यायचा हे पंच ठरवतील, पण जर विश्वविजेता ठरवायचा असेल तर किमान १० षटकांचा खेळ होणे क्रमप्राप्त असेल. जर १० षटकांचा खेळ होत नसेल तर हा सामना रद्द केला जाऊ शकतो. जर १० षटकांचा खेळ होणार नसेल, तर महिला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर ८ मार्चला सामना होऊ शकला नाही, तर हा सामना ९ मार्चला (सोमवारी) खेळवला जाऊ शकतो. पण जर सोमवारीही सामना झाला नाही तर, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.
महिला टी-२० वर्ल्डकपच्या फायनलचा सामना रविवारी झाला नाही तर तो सोमवारी होऊ शकतो. पण जर फायनल सोमवारी होऊ शकली नाही तर फायनलमध्ये पोहोचलेल्या दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात येऊ शकते. २००२ साली चॅम्पियन्स करंडकाच्या फायनलमध्येही ही गोष्ट पाहायला मिळाली होती. या फायनलचा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर राखीव दिवसही वाया गेला होता. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times