मुलांना जे हेल्मेट घातले जाईल त्या हेल्मेटला भारतीय मानक ब्युरो (BIS) ची मान्यता असावी. तसं न केल्यास चालकावर कारवाई होऊ शकते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट केले आहे. मुलाला चालकाशी जोडण्यासाठी सेफ्टी हार्नेस लावणे आवश्यक आहे, असं ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
सेफ्टी हार्नेस हा एक प्रकारचा बनियान आहे, जो मुलांना घातला जातो. हा अॅडजस्टेबल असतो. त्यात बनियानला जोडलेल्या पट्ट्यांची एक जोडी आणि एक शोल्डर लूप असतो, जो चालकाने घातलेला असतो. अशा प्रकारे मुलाच्या शरीराचा वरचा भाग चालकाशी किंवा दुचाकीस्वाराशी सुरक्षितपणे जोडलेला असतो.
सेफ्टी हार्नेसबाबत, हे बीआयएसच्या सर्व नियमांनुसार असावे. वजनाने हलके आणि अॅडजस्ट करणारे असावे. वॉटरप्रूफ आणि टिकाऊ देखील असावे. यासंबंधी कोणाला काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ते ईमेलद्वारे कळवू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times