हायलाइट्स:
- आयशर टेम्पोने दुचाकीला दिली धडक
- महिला गंभीर जखमी
- गर्भातील बाळाचा मृत्यू
या प्रकरणात विकी सुरेश भगुरे (२५, रा. साठेनगर, वाळूज, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी हा पत्नीला दुचाकीवर (एमएच-१७-एपी-७४१५) वाळूज येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेत होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास ओअॅसिस चौकातील सिग्नलजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव आयरशने (क्रं. आरजे-१०-जीए-७४९९) फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात फिर्यादी व त्याची पत्नी दुचाकीवरुन खाली पडले. फिर्यादीच्या पत्नीला कंबरेला मार लागून ती गंभीर जखमी झाली. तिला उपाचारासाठी घाटीत आणले असता उपचारादरम्यान फिर्यादीच्या पत्नीच्या गर्भातील नऊ महिन्यांचे बाळ मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी एमाआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन चालक भिमसिंग तेजसिंग (रा. राजस्थान) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times